Ram Kadam On Coldplay Ticket Row (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Coldplay Ticket Row: ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्ट तिकिटांच्या (British Rock Band Coldplay's Concert Tickets) कथित काळाबाजारावरून (Black Market) वाद निर्माण झाला आहे. कॉन्सर्टशी संबंधित तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या तक्रारीवरून EOW ने तपास सुरू केला आहे. तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बुक माय शो (Book My Show) च्या सीईओला समन्स बजावले आहे. या संपूर्ण वादावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम (Ram Kadam)  यांनी महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा काळाबाजार होऊ देणार नाही आणि दोषींना शिक्षा केली जाईल, असा दावा केला आहे.

कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांचा काळाबाजार हे सुनियोजित षडयंत्र आहे - राम कदम

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी सांगितले की, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवले जाईल. राज्यात तिकीटांचा काळाबाजार होऊ देणार नाही. पैसे कमविण्याचा हा सुनियोजित कट आहे. या कटात आयोजक आणि तिकीट विक्री करणारी कंपनी सर्व सहभागी आहेत. अवघ्या एका मिनिटात सर्व तिकिटे विकली गेली हे कसे शक्य आहे? मुंबई पोलीस लवकरच या सगळ्याचा पर्दाफाश करणार असून या कटाचा म्होरक्या तुरुंगात जाणार असल्याचंही राम कदम यांनी यावेळी नमूद केलं आहे. (हेही वाचा -Coldplay Mumbai Concert: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow वर तिकिटांचा काळाबाजार करण्याचा कट रचल्याचा आरोप; EOW ने सीइओआणि अधिकाऱ्यांना बजावले समन्स)

दोषींना होणार शिक्षा -

हे उद्धव ठाकरेंचे सरकार नाही. हे एकनाथ शिंदे यांचे सरकार असून दोषींना शिक्षा होईल. ज्यांनी पैसे भरले आहेत ते नक्कीच कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बुक माय शोची मूळ कंपनी बिग ट्री एंटरटेनमेंटचे सीईओ आशिष हेमराजानी आणि कंपनीचे तंत्रज्ञान प्रमुख यांना कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या कथित काळ्या बाजारात विक्रीच्या चौकशीच्या संदर्भात समन्स बजावले आहे. दोघांनाही शनिवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असंही राम कदम यांनी सांगितलं. (हेही वाचा: Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल)

कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या काळाबाजावर काय म्हणाले राम कदम? पहा व्हिडिओ - 

दरम्यान, अधिवक्ता अमित व्यास यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे समन्स पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये 19 ते 21 जानेवारी 2025 दरम्यान डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप तिकीट व्यासपीठावर करण्यात आला आहे. व्यास यांच्या म्हणण्यानुसार, तिकिटांची मूळ किंमत 2,500 रुपये होती. बुक माय शोने जनतेची आणि कोल्डप्लेच्या चाहत्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. वकिलाने कंपनीविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.