Coldplay Mumbai Concert: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बुकमायशोचे (BookMyShow) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमराजानी, संचालिका शमिता घोष आणि उपाध्यक्ष अनिल माखिजा यांना समन्स बजावले आहे. वकील अमित व्यास यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे समन्स बजावले असून, तिकिट प्लॅटफॉर्मवर आगामी कोल्डप्ले कॉन्सर्टच्या शोच्या तिकीटांचा काळाबाजार करण्याचा कट रचला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, ‘आम्ही तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे आणि इतर वेबसाइटवर तिकीट विकण्यात गुंतलेल्या तृतीय-पक्ष कंपन्यांसह सर्व संबंधित व्यक्तींचे स्टेटमेंट रेकॉर्ड करू.’

व्यास यांनी आधीच आर्थिक गुन्हे शाखेला निवेदन नोंदवले आहे. त्यामध्ये आरोप आहे की, बुकमायशो जाणीवपूर्वक सामान्य जनता आणि कोल्डप्लेच्या चाहत्यांची फसवणूक करण्यासाठी फसव्या क्रियाकलापांमध्ये गुंतले आहे. फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी ते करत आहेत. कोल्डप्लेची तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार होती, मात्र बुक माय शोने काळाबाजारात गुंतलेल्या एजंट्ससाठी विशेष लिंक्स तयार केल्या, ज्यामुळे त्यांना तिकिटांसाठी वाढीव किमती आकारता आल्या. या प्रकारामुळे अनेक चाहत्यांना आहे त्या किंमतीमध्ये तिकिटे विकत घेता आली नाहीत. (हेही वाचा: Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल)

कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत बुकमायशोवर  तिकिटांचा काळाबाजार करण्याचा कट रचल्याचा आरोप-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)