मुंबई: COVID-19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी घाटकोपर मध्ये केली फटाक्यांची आतिषबाजी, See Pics
BJP Workers Celebrations (Photo Credits: Twitter/ANI)

देशभरात आज सर्वत्र कोविड लस (COVID-19 Vaccine) आल्याने त्याचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली कोविड लस अखेर भारतात आल्याने कोरोनाने भयभीत झालेल्या नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अशातच आज महाराष्ट्रातही कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात लसीकरणाचा पहिला टप्पा मुंबईत देखील सुरु झाल्याच्या निमित्ताने घाटकोपर (Ghatkopar) येथे भाजप कार्यकर्त्यांनी (BJP Workers) फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. संपूर्ण देशभरातून आज कोविड लसीचे आगमन झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रात मुंबई येथे कोविड लसीच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. यामुळे घाटकोपर येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.हेदेखील वाचा- Adar Poonawalla Participated In Vaccination Drive: कोविशील्ड लसची निर्मिती करणारे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांचा लसीकरण मोहिमेत सहभाग; पहा व्हिडिओ

पाहा फोटोज

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईतील पहिली लस देण्यात आली. त्यानंतर इतर डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक यांना लस देण्यात येईल. दरम्यान, यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) देखील उपस्थित होते.

कोरोनाची लस मिळाली तरी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सर्वांना लस मिळायला अजून वेळ आहे. तसंच लसीचा प्रभाव तपासण्यासाठी देखील काही अवधी जाईल तोपर्यंत तोंडावरचा मास्क हीच खरी लस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.