Nitesh Rane: सरकार पडायची वेळ येथे तेव्हा मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का लावतात? नितेश राणे यांची महाविकासआघाडी सरकारवर टीका
Nitesh Rane | (Photo Credits: Facebook)

मी न्यायालयीन कोठडीत असताना माझ्या प्रकृतीबाबत ज्यांनी आरोप केले ते पाहून मला आश्चर्य वाटले. मला शुगर आणि पाठिच्या मणक्याचा त्रास यापूर्वीही होता. मी न्यायालयीन कोठडीत असतानाही माझी तपासणी झाली तेव्हाही त्याबातब रिपोर्ट आले. तरीही काही लोकांनी हा राजकीय अजार असल्याची टीका माझ्या आजारावर केली. कोणाच्याही आजारपणावरुन टीका करणे हे योग्य नसल्याचे मत नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी या वेळी व्यक्त केले. संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणी सिंधुदुर्गातील ओरोस न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे ( Nitesh Rane) प्रथमच प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आजारपणावर केलेल्या टीकेमुळे नाराज झालेल्या नितेश राणे यांनी महाविकासआघी सरकारवर या वेळी जोरदार टीका केली. जेव्हा सरकार पडण्याची, आरोपांना उत्तरे द्यायची वेळ येथे तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लता दिदींच्या अंतीम दर्शनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. मात्र, विधिमंडळ अधिवेशन सुरु असते तेव्हा मुख्यमंत्री आजारी कसे पडतात? महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची चौकशी लागते तेव्हाच त्यांना कोरोना का होतो, असे प्रश्न आम्ही विचारायचे का? असे म्हणत नीतेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. (हेही वाचा, Nitesh Rane Discharged: जामीन मिळाल्यानंतर नितेश राणेंच्या प्रकृतीत सुधारणा, सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज)

नितेश राणे यांनी पुढे बोलताना म्हटले की, पहिल्या दिवसापासून म्हणजे 18 डिसेंबरपासून आजपर्यंत. मी पहिल्या दिवसापासून पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना सर्व मदत करत होतो. यापुढेही पोलीस खात्याला जी मदत लागेल ती मी देईन. मला न्यायालयाने ज्या आटी शर्थी लावून दिल्या आहेत त्या सर्व अटी शर्थींचे पालन करुन, आयजींना भेटून मदत करेन. मी कोणत्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. मला जेव्हा जेव्हा फोन आले, संपर्क केला गेला. तेव्हा तेव्हा मी तिथे गेलो होतो. म्हणजे कोणत्याही तपास कार्यात मी अडथळा आणला नाही. माझ्याकडे जी काही माहीती होती ती सर्व माहिती मी पोलिसांना दिली आहे.

मी दोन वेळा निवडून आलेला विधिमंडळ सदस्य आहे. जाबाबदारीने वागणे मला महत्त्वाचे असते. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा कोणी मदत मागते तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी ती मदत करत असतो, असे सांगत नितेश राणे म्हणले, मी कधीही अटकेपासून पळालो नाही. पोलिसांना मला कोणत्याही पद्धतीने अटक करता आली नाही. असे असताना कोर्टाबाहेर जे घडलं. माझी गाडी आडवली. माझ्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या. त्यानंतर मी आणि कुटुंबीयांनी विचार केला. माझ्यामुळे माझे मतदार, कोकण आणि इतरांना त्रास नको म्हणून माझ्या कुटुंबबीयांशी चर्चा करुन मी स्वत: सरेंडर झालो. कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडून नये यासाठी मी सरेंडर झालो, असेही नितेश राणे यांनी सांगितले.