BJP MLA Jaykumar Gore : सातारा जिल्ह्यातून अपघाताची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणियामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी होता. त्याला उपचारासाठी रुग्गणालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दहिवडी(Dahiwadi)जवळील बिदाल शेरेवाडी भागामध्ये हा अपघात घडल्याची घटना घडली. (हेही वाचा : Jaykumar Gore Health Update: आमदार जयकुमार गोरे यांची कार अपघातानंतर प्रकृती स्थिर, पीएची प्रकृती थोडी चिंतेची; आमदार राहुल कुल यांची माहिती)
दुचाकीचा चक्काचूर, २ ठार
मोठी बातमी! भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनानं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यूhttps://t.co/K9xGMXNSL8
— News18Lokmat (@News18lokmat) August 24, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर, गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. भाजप नेते, माण- खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे ही मतदार संघात फेरफटका मारत असताना हा अपघात झाला.