आमदार जयकुमार गोरे नागपूर वरून पुण्यात आल्यानंतर रस्ते मार्गे सातारा मध्ये जात असताना फलटण जवळ त्यांची गाडी नदीत कोसळली. या अपघातानंतर रूबी क्लिनिक मध्ये गोरे यांना उपचारासाठी दाखल केले आहे. आमदार राहुल कूल यांनी त्यांची रूग्णालयात भेट घेतली आहे. राहुल कूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार यांंची प्रकृती स्थिर आहे. शुद्धीवर असून बोलत आहेतत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. पण त्यांच्या पीए ची प्रकृती थोडी चिंताग्रस्त आहे.  यावेळी कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नक्की वाचा: Jaykumar Gore Car Accident: भाजपा आमदार जयकुमार गोरे यांची कार नदीत कोसळून भीषण अपघात; प्रकृती स्थिर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)