Jaikumar Gore | PC: Twitter

भाजपा आमदार जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांच्या वाहनाला फलटण (Phaltan) जवळ भीषण अपघात झाला आहे. जयकुमार मुंबई मधून आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान त्यांची गाडी 50 फूट खोल नदीमध्ये कोसळल्याची माहिती आहे. यामध्ये आमदार गोरे यांच्यासह 3 अन्य गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर पुण्याच्या रूबी क्लिनिक हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. बाणगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी 50 फूट खोल नदीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून त्यांची गाडी खाली दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. नक्की वाचा: Kerala Road Accident: सबरीमाला मंदिरात जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात; 8 जणांचा मृत्यू .

जयकुमार गोरे हे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करतात. ते मुंबई मधून सातार्‍यात परतत असताना हा अपघात झाला आहे. त्यांच्यासोबत गाडीमध्ये त्यांचे कार्यकर्ते, पीए, कॉन्स्टेबल होते. पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ पुलावरून गाडी जात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बचावकार्य तातडीने पार पडल्यानंतर त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.नक्की वाचा: Jaykumar Gore: आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, मयत व्यक्तीच्या नावे प्रतिज्ञापत्र बनविल्याचा आरोप .

जयकुमार गोरे यांच्या वाहनाला पहाटे 3 च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या अपघाताचं वृत्त समजताच तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. गोरे यांना गंभीर दुखापत असली तरीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.