मुंबई: गोपाळ शेट्टी यांची निवडणूक निकालापूर्वीच सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरु, मिठाईच्या दुकानाला दिली 2000 किलोची ऑर्डर
Gopal Shetty Orders 2000 kg Of Sweets (Photo Credits: Facebook/Twitter/ANI)

बोरिवली : लोकसभा निवडणुकांनी (Loksabha Elections) मागच्या दोन महिन्यांपासून प्रत्येक भारतीयाची उत्सुकता ताणून ठेवली आहे त्यामुळे येत्या 23 मे ला निकाल जाहीर झाल्यावर देशभरात धम्माल होणार यात काही शंकाच नाही. पण मुंबईतील बोरिवली (Borivali) परिसरात निकालाच्या चक्क दोन दिवस आधीच सेलिब्रेशनची तयारी सुरु करण्यात आली आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून (North Mumbai Loksabha Constituency) निवडणुकीत उभे राहिलेल्या गोपाळ शेट्टींनी मिठाई दुकानाला तब्बल 1500 ते 2000 किलो मिठाईची ऑर्डर दिली आहे. उत्तर मुंबईत भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसच्या (Congress)  उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) अशी लढत पाहायला मिळाली होती.

मिठाईची ऑर्डर मिळालेल्या दुकानाच्या मालकाने ANI शी संवाद साधत सांगितले की, गोपाळ शेट्टी यांच्याकडून आम्हाला 1500 ते 2000 किलो मिठाईची ऑर्डर मिळाली आहे. निवडणूक आणि निकालाबाबत आमच्या कामगारांमध्ये देखील इतका उत्साह आहे की, त्यांनी मोदींच्या ,चेहऱ्याचा मुखवटा घालून मिठाई बनवायला घेतली आहे. पंतप्रधान कोण होणार ते कळवा आणि 'Zomato' वर कॅशबॅक-सूट मिळवा

ANI ट्विट 

निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायला अजून 48 तासांचा अवकाश असला तरीही अलीकडे माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार देशभरात भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.  उत्तर मुंबई हा भाजपासाठी सर्वात जास्त मोक्याचा मतदारसंघ म्ह्णून ओळखला जातो, गोपाळ शेट्टींनी याआधी 2014 मध्ये काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा 4 लाख मतांनी पराभव करून ही जागा भाजपाला मिळवून दिली होती. Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी

 

यंदा ते सलग दुसऱ्यांदा भाजपा तर्फे उत्तर मुंबईतुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर त्यांच्या विरुद्ध अभिनयातून आता राजकारणात पदार्पण करणाऱ्या उर्मिला मातोंडकरने देखील दमदार प्रचार व भाषणांनी नागरिकांमध्ये आपली छाप पाडली होती. पण तरीही आपणच जिंकणार असे गृहीत धरून इतक्या मिठाईची ऑर्डर देत निकालाच्या आधीच त्यांनी आपल्या विजयाचे सेलिब्रेशन करण्याची तयारी सुरु केली आहे