Zomato Logo (Photo Credits: Facebook)

लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल नुकताच समोर येताच लोकांच्या भुवया उंचावल्या असून आता लोकांची निकालाबाबतची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचलीय. तसेच भारताचा पंतप्रधान कोण होणार ह्या बाबत लोकांमध्ये चर्चाही रंगू लागलीय. ह्या निवडणूकांमध्ये प्रसारमाध्यमे, जाहिरात क्षेत्र आणि अन्य क्षेत्रांनी उडी घेतली असून आता झोमॅटो ने ही (Zomato) ह्या निवडणूकीच्या निकालामध्ये उडी घेतली आहे. जर तुम्ही पुढील पंतप्रधान कोण होणार ह्या बाबत अंदाज वर्तवला तर, तुम्हाला झोमॅटो 2 ऑफर्स देत आहेत. ज्यात तुम्हाला 40 टक्के सूट आणि 30 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

‘झोमॅटो इलेक्शन लीग’(Zomato Election League) या नावाने झोमॅटोने आपल्या ग्राहकांसाठी या ऑफर्स ठेलल्या आहेत. यामध्ये तुम्ही पुढील पंतप्रधान कोण असेल? याचा अंदाज वर्तवल्यास 500 रुपयांपर्यंतच्या ऑर्डरवर तुम्ही 30 टक्के कॅशबॅक जिंकू शकता. त्यासाठी झोमॅटो अॅपवर जाऊन तुम्ही पुढील पंतप्रधान कोण असेल याचे हे सांगितले आणि तोच उमेदवार पंतप्रधान झाला, तर तुम्हाला 30 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

तसेच जर तुमचा अंदाज चुकला तरी प्रोमो कोड वापरुन तुम्ही केलेल्या ऑर्डरवर 40 टक्के सूट मिळवू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी झोमॅटो अॅपमध्ये जाऊन

‘झोमॅटो इलेक्शन लीग' मध्ये सहभागी व्हावे लागणार आहे.

Zomato लवकरच ड्रोनद्वारे करणार डिलिव्हरी; TechEagle कंपनीची खरेदी

ऑनलाईन फूड ऑर्डरिंग कंपनी झोमॅटो नेहमीच काही ना काही नवनवीन गोष्टी ग्राहकांना देण्यासाठी प्रयत्नशील असते.अलीकडेच या कंपनीने ड्रोन स्टार्टअप कंपनी टेक इगल इनोव्हेशन्स विकत घेतली आहे. लखनऊ स्थित टेकइगल इनोव्हेशन्स ही कंपनी ड्रोन निर्मितीवर काम करते. ड्रोनद्वारे ऑर्डर डिलिव्हरीसाठी याची नक्कीच मदत होईल. यामुळे हायब्रिड मल्टी-रोटर ड्रोनद्वारे हब-टू-हब वितरण नेटवर्क बनविण्यासाठी याचा फायदा होईल, असे या कंपनीचे म्हणणे आहे.