BJP नेते किरीट सोमैया यांना मुंबई पोलिसांकडून अटक; ट्विट वरून स्वतः दिली माहिती
File image of BJP MP Kirit Somaiya | (Photo Credits: IANS)

भाजपचे (BJP) नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुलुंड (Mulund)  येथील त्यांच्या निवासस्थानातुन अटक केली आहे. याबाबात सोमैया यांनी स्वतःहून ट्विट करत माहिती दिली . काल जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या बंगल्यावर ज्या अनंत करमुसे (Anant Karmuse)  नामक अभियंत्याला मारहाण झाली त्यांना भेटण्यासाठी सोमैया हे जाणार होते, तिथे जाण्यापासून रोखत नीलमनगर (Nilamnagar) येथील सोमैया यांच्या राहत्या घरून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. येथून सोमैया यांना मुलुंड पूर्व येथील नवघर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा- देवेंद्र फडणवीस

किरीट सोमैया यांचे ट्विट शेअर करत भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून सुद्धा महाराष्ट्र सरकारला सवाल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारला दिल्ली मरकजहून परतलेल्या तबलिगी जमातच्या लोकांना शोधायला वेळ नाहीये, पण सामान्य जनतेला मदतकार्य करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमैया यांना अटक करायला भरपूर वेळ आहे. असा आरोप सुद्धा भाजप महाराष्ट्राच्या हॅण्डल वरून महाराष्ट्र सरकारवर करण्यात आला आहे.

किरीट सोमैया ट्विट

भाजप महाराष्ट्र ट्विट

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला मारहाण झाल्याचे प्रकरण कालपासून चर्चेत आहे. आव्हाडांच्या बाबत करमुसे नामक या व्यक्तीने आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याच्या रागातून त्याला आव्हाड यांच्या अंगरक्षकांनी बेदम मारहाण केली होती, यावेळी आव्हाड सुद्धा उपस्थित होते असा दावा या तरुणाने केला आहे, आपल्या अंगावरील जखमा दाखवत त्याने पुन्हा व्हिडीओ शेअर केला होता. एकीकडे याप्रकरणी आव्हाडांच्या अंगरक्षकांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे तर हा दावा खोटा असल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे. याच प्रकरणी आज सोमैया हे अनंत कारमुसे यांना भेटण्यासाठी जाणार होते.