राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे चित्र एडीट करून ते समाज माध्यमांवर टाकणाऱ्या एकाला त्याच्या अंगरक्षकांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस दल, महत्वाची भुमिका बजावत आहे. यांच्या सन्मानात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी नागरिकांना दिवे लावण्याचे आवाहन केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. यामुळे राजकारण पेटले आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: पुण्यातील अनेक भागात संचारबंदी झाली कडक; दुकाने फक्त दोन तासच सुरु राहणार, मास्कशिवाय बाहेर फिरण्यास मनाई

देवेंद्र फडणवीस यांची ट्विट- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.