Uddhav Thackeray, Keshav Upadhye (Photo Credit: PTI/ Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी करोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत, अनलॉकबाबत बोलताना जनतेला संदेशही दिला आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधणार भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाद्धय (Keshav Upadhye) यांनी टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण राज्यातील जनतेला निराश करणारे होते. त्यांनी जनतेच्या नाराजीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच नाराजी व्यक्त केली आहे, असेही उपाद्धय म्हणाले आहेत.

“नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे निराश करणारे फेसबुक लाईव्ह. जनतेच्या नाराजीची दखल न घेतां जनतेवरच नाराजी व्यक्त करणारे संबोधन. यामध्ये वाढीव वीजबिलाबाबत जनतेला काहीही दिलासा नाही की शेतकऱ्यांना काही मदत नाही. तसेच राज्यातील समस्यांवर काही उपाय नाहीत. ना ठोस कृती, ना उपाय", अशा आशयाये ट्विट केशव उपाद्धय यांनी केले आहे. हे देखील वाचा- Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी साधला संवाद; 'या' मुद्द्यांवर केले भाष्य

केशव उपाद्धय यांचे ट्विट-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील अनेक उद्यागधंदे, व्यवसाय आणि वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी बंद होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात बंद गोष्टी टप्प्याटप्याने सुरु करण्यात येत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येत घट होत असताना राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्ती केली जात आहे.