शिवसेना पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी सोबत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याने आशिष शेलार यांनी खोचक शब्दात शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केल्या आहेत.
भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत (Ashish Shelar Press Conference) संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याचं पण त्याही सोबत त्यांच्यावर टीका देखील केली. ते म्हणाले, "संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे."
तसेच शिवसेना त्यांचा मित्रपक्ष असूनही सेनेने त्यांची साथ सोडली. म्हणून शेलार यांनी माध्यमांसमोर सेनेला याचा जाब विचारला आहे. त्यांनी विचारलं, "शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी?"
इतकंच नव्हे तर , "अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील व नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचं संजय राऊत यांचं एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय," असा टोला आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना लगावला.
शिवसेनेवर टीका करत ते म्हणाले, "बाळासाहेबांच्या आदरापोटी नेते मातोश्रीवर जायचे पण राजकीय स्वार्थासाठी असत्य पसरवणं हे अमान्य आहे. आता सत्तेच्या लालसेपोटी हॉटेलला चर्चेसाठी जावं लागत आहे. कुटुंबातील राज ठाकरेंनाही भेटायला मातोश्रीहून कोणी जात नव्हतं. आज मातोश्रीतून निघून माणिकराव ठाकरेंना भेटायला जात आहेत."
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट
भाजपाची पुढील रणनीती काय असणार या बद्दल सांगताना ते म्हणाले, "भाजपची आज संघटनात्मक तयारीची महत्वाची बैठक आहे. 90 हजार बूथवर संघटन मजबूत करणे या विषयावर आज देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील हे आज आमदार, खासदारांना मार्गदर्शन करतील."