कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एकीकडे महाराष्ट्रात लॉक डाऊनचा (Lock Down) कालावधी वाढवला जाईल अशी दाट शक्यता आहे तर त्याच वेळी अजूनही काही मंडळींकडून कित्येक सूचना देऊनही वारंवार लॉक डाउनच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे, यामध्ये दुर्दैव असे की राजकीय मंडळी सुद्धा या नियमांना धाब्यावर बसवताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पनवेल (Panvel) मधून सध्या समोर येत आहे. पनवेल मधील भाजपचे (BJP) नगरसेवक अजय बहिरा (Ajay Bahira) यांनी बुधवारी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त लॉक डाऊन असतानाही आपल्या अकरा मित्रांच्या सोबत मिळून जय्य्त पार्टी केल्याचे समजतेय. याप्रकरणी पोलिसांनी अजय यांच्यासहित अन्य 11 जणांविरुद्ध कारवाई केली असून सर्वांना अटक करण्यात आले होते. लेटेस्ट अपडेटनुसार आता, अजय यांना जामीन देण्यात आला आहे. Lock Down काळात पुण्यात गणेश पेठेत नमाज पठणासाठी पुन्हा गर्दी; 17 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
प्राप्त माहितीनुसार, सध्या 14 एप्रिल पर्यंत तरी नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम आता स्वतः लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाले आहे. दरम्यान अशा वागणुकीसाठी अजय बहिरा यांच्या विरुद्ध कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या तरी अजय यांना जामीन मिळाला आहे पण त्यांच्यावर ही पुढील कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे संकट अधिक तीव्र; 92 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांचा आकडा 1666 वर
ANI ट्विट
Maharashtra: A BJP Corporator of Panvel Municipal Corporation, Ajay Bahira was arrested and later released on bail on charges of violating the lockdown & celebrating his birthday with his friends. He was booked along with 11 others by Navi Mumbai Police. pic.twitter.com/1v4J67y07a
— ANI (@ANI) April 11, 2020
दरम्यान, नवी मुंबई भागात कोरोनाचा उद्रेक फार सुरुवातीपासून दिसून आला होता. आता सुद्धा या भागात कोरोनाचे 32 रुग्ण असून अन्य दोघांचा या जीवघेण्या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय एकूण महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे गडद सावट आहे. आज घडीला राज्यात 1574 कोरोनाग्रस्त असून 110 जणांचा मृत्यू झाला आहे.