Asha Buchke (Photo Credit: Twitter)

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Election 2022) तोंडावर शिवसेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या आणि जिल्हा परिषदेतील माजी गटनेत्या आशाताई बुचके (Asha Buchke) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी 15 वर्ष काम केलेल्या आशा बुचके यांनी  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (19 ऑगस्ट) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.

आशा बुचके यांनी आपल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  भाजपात येणारे बहूतांश नेते हे शिवसेनेतील पदाधिकारी आहेत. यामुळे जुन्नर तालुक्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आशा बुचके यांचा भाजपला किती फायदा होतो? हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.   हे देखील वाचा- Anil Deshmukh यांच्या विरोधातील सीबीआयच्या FIR वर महाराष्ट्र सरकारला झटका, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

भाजप प्रवेशानंतर आशा बुचके यांची प्रतिक्रिया-

"शिवसेनेत असताना मी प्रत्येक निवडणूक माझी निवडणूक म्हणून काम केले आहे. भाजप माझा पिंड असल्यामुळे संघटना आणि संघटनात्मक काम हे रक्तातचे होते. ते घेऊन कार्यकर्त्याला मोठे करत असतांना तो सदस्य तरी व्हावा, यासाठी दिवसरात्र झटली आणि जून्नर नगरपरीषदेची निवडणूक काबीज केली. मी कार्यकर्त्यांच्या जोरावर 7 निवडणूका लढले. पक्ष निष्ठता कधीही सोडली नाही. परंतु, मला परकियांनी पराजित केले नाही. मला स्वकीयांनीच पराजित केले", असा आरोप आशा बुचके यांनी केला आहे.

आशा बुचके यांच्यासह पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, दिलीप गांजाळे, माजी पं. स. सभापती संगीता वाघ, माजी पं. स. स. रामदास तांबे, संदीप मेमाणे, महेंद्र सदाकाळ, विघ्नहर सहकारी कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेखा गांजाळे, हिरा चव्हाण, युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप ताजणे, माजी शहरप्रमुख संजय परदेशी (राजपूत), उपतालुकाप्रमुख ऋषी डुंबरे,विभागप्रमुख संतोष खंडागळे, मोहन मटाले यांच्यासह चार सरपंच, 2 उपसरपंच, 4 माजी सरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.