शस्त्राचा धाक दाखवून एका 42 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील राहनाळ (Rahnal) भागात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी 5 जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. यापैकी 4 आरोपींना अटक केली असून आणखी एकाजणांचा पोलीस शोध घेत आहेत. पीडित आपल्या मैत्रीणीकडे कामाची चौकशी करून घरी येत असताना राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे लाईन शेजारी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. याचपार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने नव्या कामाच्या शोधात एक 42 वर्षीय महिला चरणीपाडा परिसरात आपल्या मैत्रीणीकडे गेली होती. त्यानंतर रात्री उशीरा आपल्या घरी येत होती. मात्र, घरी येत असताना राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन शेजारील मुनिसुरत कंपाऊंड येथील झाडाझुडपाच्या आड पाचही आरोपी दारू पित होते. त्यावेळी आरोपींनी पीडित महिलेला त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेने दुसऱ्या दिवशी नारपोली स्थानकात 5 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली असून एकाजणांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती लोकमतने दिली आहे. हे देखील वाचा-धक्कादायक! पुणे येथील हडपसर परिसरातील सह्याद्री रुग्णालयात वॉर्डबॉयकडून एका कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग
नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्टी कैलास वरटे, विशाल कैलास वरटे, कुमार डाकू राठोड, अनिल कुमार शाम बिहारी गुप्ता, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नारपोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात भारवि कलम 376(ड), 341, 324, 323 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 8 ऑगस्ट रोजी त्यांना भिवंडी न्यायालयात हज केले जाणार आहे.