Photo Credit- X

Bhatsa Dam Gate Opens: ठाण्यात मुसळधार पावसामुळे तानसा, मोडकसागर धरणासह भातसा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठी रहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. 3 ऑगस्ट रोजी भातसा धरण संध्याकाळी 6 वाजता 88.87 टक्के भरले होते. पुढील 24 तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भातसा धरणाच्या जल व लाभ क्षेत्रात पडणा-या पावसाचे प्रमाण सद्या वाढत असल्याने असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य पाण्याचा साठा वाढला असल्याने धरणाचे तीन गेट 0.50 सेंटीमीटरने उघडल्याने 3832.23 क्यूसेस एवढा विसर्ग प्रवाहीत होत आहे. (हेही वाचा:Pune Flood Alert: संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातील विसर्गामुळे पुराचा धोका; बालेवाडी आणि पिंपरी येथे एनडीआरएफचे पथक तैनात )

पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर - मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल, सापगाव, नदीकाठावरील ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा:पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी; अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन )

पोस्ट पहा

शहापूर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले असून तालुक्यातील तानसा, मोडकसागर यापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकरिता वर्षभर पुरण्याचा पाणीसाठा भातसा धरणात पूर्ण झाला असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेंशन दूर झाले आहे. धरणातील पाण्याचासाठा वाढून धरण ओव्हरफ्लो होऊ नये व धरणालगतच्या गावांना पुराचा फटका बसू नये यासाठी 3 ऑगस्ट रोजी भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.