Suryakant Mahadik Passes Away: भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन
Suryakant Mahadik (Photo Credit: Twitter)

Suryakant Mahadik Dies: भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष (Bhartiya Kamgar Sena), शिवसेना (Shiv Sena) उपनेते सुर्यकांत महाडिक (Suryakant Mahadik) यांचे सोमवारी (11 जानेवारी) अल्पशा अजाराने निधन झाले आहे. सुर्यकांत महाडिक हे 74 वर्षाचे होते. मुंबईतील झेन रुग्णालयात उपाचारादरम्यान रात्री साडे आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय कामगार सेनेच्या विविध क्षेत्रातील संघटनांमध्ये त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे होते. कामगारांच्या हक्कांसाठी ते कायम संघर्षरत राहिले. भारतीय कामगार सेनेच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते 2003 पासून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष होते.

सुर्यकांत महाडिक यांच्या पार्थिव देहाचे अंतिमदर्शन मंगळवारी सकाळी 7 ते 10 दरम्यान त्यांच्या राहत्या घरी अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटलागांव, चेंबूर येथे निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मुळगावी मु.पो. काडवली, (पाचघर वाडी) ता.खेड, जि. रत्नागिरी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Ratnagiri: दुर्दैवी! ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने उमेदवाराचा मृत्यू

ट्विट-

सुर्यंकात महाडिक यांना पंचाहत्तरी गाठण्यासाठी केवळ दोनच महिने शिल्लक राहिले होते. सुर्यंकात महाडिक हे गेल्या 17 वर्षापासून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळत होते. या वयातही त्यांचा कामगार सेनेतील वावर उत्साह वाढवणारा होता. तसेच ते रिझर्व्ह बँक युनियन फेडरेशनचे सरचिटणीस होते.