Bharat Bandh: यवतमाळ येथे CAA,NRC आणि NPR चा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून दुकान बंदचा प्रयत्न, मालकाकडून मिर्ची पूडची उधळण (Video)
CAA Protest ( फोटो क्रेडिट- ANI)

आज देशभरातून विविध ठिकाणी भारत बंदची हाक देण्यात येत आहे.याच दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), एनआरसी (NRC) आणि एनपीआर (NPR) यांचा सुद्धा जोरदार विरोध करण्यात आला. तर मुंबईत सुद्धा शांतपणे मोर्चा काढून याचा विरोध करण्यात आला. पण काही ठिकाणी या भारत बंदच्या हाकेला हिंसक वळण लागले. तसेच बेस्ट बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. या सर्व परिस्थितीत पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला.सकाळच्या वेळी मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग स्थानकामध्ये  कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले होते. या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. कार्यकर्ते रेल्वे रूळावर उतरल्याने सीएसएमटीकडे (CSMT) जाणारी वाहतूक सुमारे 20-30 मिनिटं उशिराने धावत होती.

याच पार्श्वभुमीवर यवतमाळ येथे आंदोलन कर्त्यांकडून दुकान बंद करण्याची धमकी देण्यात आली. याचा संताप व्यक्त करत एका दुकानाच्या मालकाकडून मिर्ची पूडची उधळण कार्यकर्त्यांवर करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.(Bharat Bandh 2020: शेतकरी आणि कामगार संघटनांकडून आज देशव्यापी 'भारत बंद'ची हाक; 25 कोटी लोकांचा सहभाग, जाणून घ्या काय होणार परिणाम)

ANI Tweet:

महाराष्ट्र राज्यात परळी व्यापारी संघटनेने आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान मागील महिन्याभरात सतत बंद होत असल्याने त्याचा आर्थिक फटका व्यापारांना होत आहे त्यामुळे आजच्या भारत बंदमध्ये सहभागी न झाल्याचं सांगण्यात आले आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी देखील सीएए विरोधात आंदोलन करत महाराष्ट्र बंद केला होता.