भांडूप आग प्रकरण (Photo Credits-ANI)

Bhandup Fire Update: भांडुप मधील ड्रिम्स मॉलला मध्यरात्री 12 वाजता भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. सुरुवातीला ही आग पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती पुढे वाढत गेली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी 20 पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या. तर अद्यापही मॉलला लागलेली आग धुमसत आहे. याच प्रकरणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या  प्रकरणी मृतांचा आकडा 10 वर पोहचल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत या घटनेची सखोली चौकशी केली जाणार असून हलर्जीपणा समोर आल्यास दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुढे असे म्हटले आहे की, मॉलमध्ये असलेल्या कोविड19 च्या रुग्णाची मुदत येत्या 31 मार्चला संपणार होती. तर हे रुग्णालय सुरु करण्यासाठी तात्पुर्ती परवानगी दिली गेली होती. मात्र ज्या वेळी  मॉलला आग लागली तेव्हा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे घटनास्थळावरुन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यास वेळ लागला. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना मदत केली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्याचसोबत अद्याप आग मॉललमध्ये धुमसत असल्याने कोणीही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करु नये आणि नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.(भांडूप येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक, सखोल चौकशीची केली मागणी)

Tweet:

दरम्यान काल आग लागल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. तर मध्यरात्री पासून बचाव कार्य वेगाने सुरु आहे. तर सनराईज कोविड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आग सुरुवातीला पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती वाढत गेली. परंतु मॉलमध्ये कोविड19 चे सेंटर करण्यात आल्याने त्याचे सुद्धा लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु मॉलमध्ये कोरोनाचे रुग्णालय सुरु करण्यास परवानगी कशी दिली गेली असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे