बेंगलूरू मध्ये Varthur-Gunjur road वर एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूल मध्ये 9 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. या मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मनसा असं या मृत मुलीचे नाव असून ती या कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रहिवाश्यांच्या माहितीनुसार ही मुलगी अपघाताने पूलमध्ये पडली.
दरम्यान पूलामध्ये पडल्याने बुडून तिचा मृत्यू झाला की वायरीच्या शॉकने ती दगावली हे समजू शकलेले नाही. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मात्र आता तिच्या निधनाचं कारण समजू शकेल. मुलीच्या वडीलांनी तक्रार नोंदवली असून त्यांनी यामध्ये गुरूवारी संध्याकाळी मुलगी अपघाताने पूलमध्ये पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचं म्हटल्याचं सिनियर पोलिस ऑफिसरने म्हटल्याचं TOI च्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. दरम्यान मुलीला नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
दरम्यान वीजेच्या धक्क्याचादेखील अंदाज बांधला जात आहे. तिच्या अंगावर मात्र कोणत्याही जखमांच्या खूणा नाहीत. सध्या तिच्या मृत्यूच्या तपासासाठी सार्या बाजूने तपास सुरू आहे. पोलिसांनीही पोस्ट मार्टम रिपोर्ट मधून अनेक गोष्टी समोर येतील असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Mumbai: खासगी शाळेच्या जलतरण तलावात बुडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू .
मुलीच्या मृत्यूनंतर रहिवाशांनी आवाज उठवला आहे. तिला न्याय देण्याची मागणी त्यांनी उचलून धरली आहे. अशी दुर्घटना अन्य कोणत्याच मुलासोबत होऊ नये म्हणून कठोर तपास व्हावा अशी आशा मृत मुलीच्या वडिलांनी बोलून दाखवली आहे.