Maha Shivratri (Photo Credits: IANS)

Beed: सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम अंत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. अशातच आता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील महाशिवरात्रीचा उत्सव सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी 8-16 मार्च पर्यंत वैजनाथ मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याचसोबत बीड जिल्ह्यातील सर्व शिवालये 11 मार्चला बंद असणार असल्याचे ही जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जाहीर केले आहे.(शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर आकारला जाणार, नगरपंचायतीकडून टोलवसूलीचा ठराव मंजूर)

परळी वैजनाथ येथे महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी विविध ठिकाणाहून लोक गर्दी करतात. त्याचसोबत मंदिर प्रशासनाकडून पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले जाते. परंतु यंदाच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अत्यंत साधेपणाने महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे.(शिर्डी साईबाबा मंदिरातील 'साईप्रसाद' पुन्हा सुरु; भक्तांना मिळणार मोफत लाडू)

Tweet:

दरम्यान, महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी स्थानिक  प्रशासनाकडून बैठका सुद्धा बोलावण्यात आल्या  होत्या. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ किंवा राजकिय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. अशातच आता महाशिवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तो अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.