लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील (Shirdi) साईबाबांच्या दर्शनासाठी विविध ठिकाणाहून लोक दर्शनासाठी येतात. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता मंदिर प्रशासनाने साईबाबांच्या दर्शनासाठी काही नियमावली तयार केली आहे. तसेच नागरिकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी नियमांचे पालन करावे अशा सुचना सुद्धा दिल्या आहेत. अशातच आता शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश कर आकारला जाणार असल्याचा निर्णय नगरपंचायतीकडून घेतला गेला आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले आहे.(Shirdi Sai Baba Temple: शिर्डी साई संस्थानचा मोठा निर्णय! 'या' अटींचे पालन न करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही)
साईबाबा संस्थेकजून स्वच्छता निधी बंद झाल्याने नगरपंचायतीकडून हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश कर आम्ही आकारु देणार नाही. तर संस्थेकडून शहर स्वच्छतेसाठी 42 लाखांचा निधी नगरपंचायतीकडे दिला जात होता. परंतु कोरोनाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तो संस्थेकडून बंद केला गेला.(शिर्डी: साईबाबांच्या चरणी देणगी स्वरूप महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या वतीनं देण्यात आली 'Thar')
दरम्यान, मास्कचा वापर न करण्याऱ्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, जेष्ठ नागरिकांसह दहा वर्षाखालील मुलांनाही प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात पुजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. सर्व साईभक्तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत दर्शनासाठी शिर्डीत यावे. महत्वाचे म्हणजे, जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.