पंकजा मुंडे कडून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौप्यस्फोट; आज गोपीनाथ गडावरून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष!
Pankaja Munde | (Photo Credit: Facebook)

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज बीड मधील गोपीनाथ गडावरून आपल्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहे. मात्र हा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. PTI वृत्तसंस्थेच्या ट्वीटनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीट वाटप करण्यात आले होते. मात्र काही उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले होते. तिकीट न देण्याचा निर्णय हा दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्रातूनच घेण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विधानसभा निवडणूकीतील खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही म्हटले आहे. पंकजा मुंडे यांच्या नव्या फेसबूक पोस्टमुळे भाजपचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते होणार खूश.

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश मेहता यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. सोबतच राज्यात भाजपाने 105 जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा मिळवल्या मात्र 'मुख्यमंत्रीपदा'वरून वाद झाल्याने शिवसेना- भाजपा युतीमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले. पंकजा मुंडे यांचा देखील विधानसभा निवडणूकीमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे आता त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे भाजप सोडणार? राजकीय चर्चांना उधाण.

आज (12 डिसेंबर) भाजपा नेते आणि पंकजा मुंडे यांचे वडील गोपिनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्याचं औचित्य साधुन पंकजा मुंडे गोपिनाथ गडावर शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे देखील आज गोपिनाथ गडावर पोहचले आहेत. त्यामुळे आज नेमकी भाजपामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.