Beed ACB Raid: पाटबंधारे अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा; नोटांचे बंडल, चांदीची भांडी अन् दागिनेही सापडले
Photo Credit -X

Beed ACB Raid: बीडच्या माजलगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई(,Beed Crime News) केली आहे. पाटबंधारे विभागात (PWD officer) कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगर यांच्या घरातून लाखोंचा मुद्देमाल एसीबीने (ACB raid)जप्त केला आहे. यात रोखरकमेसह सोने, चांदी यांचाही समावेश आहे. एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतातून गाळ उपसा परवानगी देण्यासाठी सलगर याने शेतकऱ्याकडून (Farmer) 28 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावर सापळा रचून सलगर याला लाच (Bribe) स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले होते. त्या अनुषंगाने घरात मोठं घबाड असल्याची शक्यता बाळगत एसीबीने त्यांच्यावर कारवाई केली. परिणामी मोठी माया एसीबीच्या हाती लागली आहे. (हेही वाचा:Rajan Salvi यांच्या रत्नागिरीच्या घरी पुन्हा ACB कडून छापेमारी; रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल )

शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्यावर कारवाई सुरू होती. अशातच त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता 11 लाख रुपये रोख स्वरूपात आढळून आलेत. तर 30 ग्रॅम सोने , 3 किलो 400 ग्रॅम चांदी असा लाखोंचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, अंमलदार सुरेश सांगळे, सुदर्शन निकाळजे , स्नेहलकुमार कोरडे आणि गणेश मेहेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वी एसीबीच्या पथकाने बीड शहरात कारवाई करत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईत एसीबीने खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड (Cash), 970 ग्रॅम सोने व पाच किलो चांदी (Silver) जप्त केले होते.