Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड कलाकार सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याने गेल्याच महिन्यात आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकरली होती. काहींनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर घराची झडती घेतली असता त्याच्या तीन डायरी आणि वैद्यकिय रिपोर्ट्स ही हस्तगत करण्यात आले होते. या प्रकरणी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. याच दरम्यान आता आज वांद्रे पोलीस स्थानकात तीन मानसोपचारतज्ज्ञ आणि एका मनोचिकित्सकाने जबाब नोंदवला आहे.(Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी यशराज चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांची 4 तास चौकशी)

यापूर्वी सुशांत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, राम गोपाल वर्मा यांच्यासह अन्य काही जणांनी त्यांचा जबाब पोलीस स्थानकात नोंदवला आहे. तर काही दिवसांपूर्वी रिया हिने CBI चौकशीची मागणी केली होती. तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्विटच्या माध्यमातूनही ही विनंती केली होती. यावर अनिल देशमुख यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची गरज नाही आणि मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यास सक्षम आहे असे म्हटले होते.

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात आतापर्यंत 36 लोकांची चौकशी केली आहे. इतकच नव्हे तर सुशांत डिप्रेशन मध्ये असल्या कारणाने ज्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत होता त्यांचीही चौकशी केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी बिहारच्या पूर्व संसद पप्पू यादव यांनी सुद्धा अमित शाह यांच्याकडे पत्रातून केली होती.