Balasaheb Thorat on BJP: बिहार मधील जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे भाजपकडून जाहीर; बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राबद्दल उपस्थितीत केला 'हा' प्रश्न
Balasaheb Thorat | (Photo Credits: Facebook)

Balasaheb Thorat on BJP:  बिहार विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते बिहार मध्ये भाजप पक्षाचा वचननामा जाहीर करण्यात आला. या वचननाम्यात कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर ती बिहारवासियांना मोफत दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावरुन आता विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या या वचननाम्यात दिलेल्या कोरोनाच्या लसी संदर्भात प्रश्न उपस्थितीत केले आहेत. तसेच महाराष्ट्राला कोरोनाची लस दिली जाणार की नाही असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.(Rahul Gandhi Attacks Modi Govt: बिहार मधील प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असे वचननाम्यात जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल)

कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच कोरोनावरील लस येण्यास अद्याप वेळ आहे. पण बिहार विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपने तेथील जनतेला मोफत लस देणार असल्याचे वचन दिले आहे. असे असेल तर महाराष्ट्रात निवडणूका नाहीत म्हणून त्यांना कोरोनाची लस देणार नाही का असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. तसेच लसीसाठी देशातील जनतेचा पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे फक्त बिहारवासियांसाठीच लस का दिली जाणार आहे. याबद्दलचे आश्वासन देऊन भाजपला काय साध्य करायचे आहे? हे फक्त लोकांची दिशाभूल करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयाला मिळाली पाहिजे असे ही थोरात यांनी म्हटले आहे.(COVID-19 Vaccine: कोरोना व्हायरस लस पुरवण्यासाठी मोदी सरकारने ठेवले 51,000 कोटींचे बजेट; जाणून घ्या प्रतीव्यक्ती येणारा खर्च)

दरम्यान, मोदी यांचे भाजप नेते फडणवीस यांनी बिहारवर अधिक प्रेम असल्याचे म्हटले होते. त्यावरुन सुद्धा थोरात यांनी निशाणा साधला आहे. थोरात यांनी असे म्हटले की, बिहारवर अधिक प्रेम आहे. तर महाराष्ट्रावर नाही का? तसेच प्रेम असेल किंवा नसेल तर महाराष्ट्राला लस दिली जाणार नाही का? ऐवढेच नव्हे तर निवडणूकांच्या काळात भाजप कडून मोठी आश्वासने जनतेला दिली जातात. पण ती सत्यात खरंच उतरली का हे बिहारच्या जनतेने गेल्या पाच वर्षात पाहिले आहे. दुसऱ्या बाजूला बिहार विधानसभा निवडणूकीसाठी उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी रॅलीत सहभागी होणार आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सुद्धा बिहार मध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.