Sanjeevani Karandikar | PC: Twitter/Arvind Sawant

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या भगिनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आत्या संजीवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar) यांचं आज (13 मे) वृद्धपकाळाने निधन झाले आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या आठ अपत्यांपैकी संजीवनी करंदीकर या सध्या हयात असलेल्या एकमेव होत्या मात्र आज त्यांनीही या जगाचा निरोप घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि संजीवनी करंदीकर यांच्यामध्ये 6 वर्षांचे अंतर होते. त्यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अरविंद सावंत ट्वीट

मनिषा कायंदे ट्वीट

संजीवनी यांनी आरबीआय मध्ये 38 वर्ष मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केले आहे. आज संध्याकाळी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी अनेक वाहिनींना दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब आणि त्यांच्यामधील भावा-बहिणींच्या गोड नात्याच्या आठवणी ताज्या केल्या होत्या.