दसर्याच्या रात्री मुंबई मध्ये वांद्रे पूर्व भागात झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकींच्या हत्येने मुंबई हादरली असताना आता या खूनामागील कारणं शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकरणामध्ये 2 शूटर आणि त्यांना मदत करणारे काही सहकारी मिळून एकूण 10 जण अटकेत आहेत. दरम्यान मुंबई क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, स्नॅपचॅट या इंस्टंट मेसेजिंग अॅप वरून तीन आरोपींचा लॉरेंस बिष्णोई चा भाऊ अनमोल बिष्णोई सोबत संवाद झाला आहे.
अनमोल हा अमेरिका आणि कॅनडा मधून संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी आरोपींकडून 4 फोन ताब्यात घेतलेले आहेत. आरोपी एकमेकांशी स्नॅपचॅट वरून संपर्कामध्ये होते. त्यांना या अॅप वर सूचना मिळत होत्या. त्यांना सूचना मिळताच ते संबंधित मॅसेज डिलीट देखील करत होते. पोलिसांनी जेव्हा आरोपींचे स्नॅपचॅट अकाऊंट नीट तपासले तेव्हा शूटर्स आणि प्रविण लोणकर हे अनमोल बिष्णोई सोबत थेट संपर्कामध्ये होते अशी माहिती समोर आली आहे. Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो .
NCP leader Baba Siddiqui murder case | The shooters were in contact with Lawrence Bishnoi's brother Anmol Bishnoi before the murder of Baba Siddiqui. The three suspected shooters who committed the murder had talked to Anmol Bishnoi through an instant messaging app ()…
— ANI (@ANI) October 23, 2024
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आरोपींचा शोध सुरू असताना एका फेसबूक पोस्ट वरून या हत्येची जबाबदारी बिष्णोई गॅंगने स्वीकारली आहे. असं म्हटलं जात होत पण ते अकाऊंट थेट बिष्णोई गॅंगच्य्या कोणत्याही नेहमीच्या अकाऊंटपैकी नव्हते त्यामुळे यामध्ये त्यांचा थेट संबंध आहे का? याचा तपास सुरू आहे. सलमान खानला बिष्णोई गॅंग कडून अनेकदा धमक्या आल्याने त्याची बरीच चर्चा आहे.