माजी मंत्री आणि एनसीपी नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर Mumbai Police Crime Branch कडून मोक्का कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये त्यांचे अभिनेते सलमान खान सोबत असलेले संबंध पाहता बिष्णोई समाजाने त्यांना लक्ष्य करत मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी ही हत्या केल्याचं म्हटलं आहे. मात्र यावर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा माजी आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) याने नाराजी व्यक्त केली आहे. झिशान ने मीडीयाशी बोलताना अद्याप त्याला चार्जशीट मिळाली नाही पण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांवरील वादाशी कोणताही संबंध असण्याची शक्यता नाकारल्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नक्की वाचा: Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल; सलमान खान शी जवळीक असल्याने लक्ष्य केल्याची माहिती .
झिशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेले प्रश्न
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये अनमोल बिष्णोई आणि लॉरेंस बिष्णोई यांचं कनेक्शन लावणं आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा वाद धुडकावणं मला पटत नसल्याचं झीशान म्हणाला आहे. "मला जाणून घ्यायचे आहे की अनमोल बिष्णोईने बाबा सिद्दीकींची हत्या केल्याची कबुली दिली आहे का? अनमोल बिश्नोई किंवा इतर कोणाची चौकशी झाली आहे का?...अमेरिकेसोबत प्रत्यार्पण करार असेल तर अनमोल बिश्नोईला भारतात परत आणा...मुख्य सूत्रधार अद्याप पकडले गेले नाहीत. जर बिल्डर लॉबीला आरोपपत्रातून वगळण्यात येत असेल तर माझा प्रश्न असा आहे की अनमोल बिश्नोई किंवा लॉरेन्स बिश्नोई यांनी माझ्या वडिलांना मारण्यासाठी कोणत्याही बिल्डरने त्यांना सांगितले नाही का?...त्यासाठी मी मुंबई पोलीस कमिशनर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. मला खात्री आहे की या देशाची न्यायव्यवस्था मला आणि माझ्या कुटुंबाला नक्कीच न्याय देईल."
#WATCH | Mumbai: On Mumbai Police Crime Branch filed a chargesheet in NCP leader Baba Siddique murder case, his son and NCP leader Zeeshan Siddique says "I also came to know that the chargesheet has been filed, we have not received the copy of the chargesheet but we will apply… pic.twitter.com/1cSiEwU4Ze
— ANI (@ANI) January 7, 2025
मुंबई मध्ये 12 ऑक्टोबर 2024 दिवशी दसर्याच्या रात्री वांद्रे पूर्व भागात झीशन सिद्दीकीच्या ऑफिसबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणामध्ये 26 आरोपींविरूद्ध मोक्का लावला आहे.