खासदार अरविंद सावंत (Photo Credits-ANI)

अयोध्येतील राम मंदिराच्या भुमीपुजनाची तारखी ठरवण्यात आली आहे. यासाठी मंदिराचे ट्रस्टी यांनी 3 किंवा 5 ऑगस्ट ही तारीख शुभ असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर यामधील एक तारीख नक्की करण्यासंदर्भातील प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. याच दरम्यान शिवसेनेचे खासदार यांनी काल असे म्हटले की, शिवसेना राम मंदिराच्या भुमीपुजनाच्या आमंत्रणाची चिंता करत नाही. आता पुन्हा अरविंद सावंत यांनी असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील अयोध्येत जायचे की नाही.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा असे म्हटले होते की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अयोध्येत गेले होते. शिवसेनेकडून राम मंदिराच्या उभारणीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले आहेत. त्यामुळे अयोध्या दौऱ्यासाठी आता पुन्हा आमंत्रणाची गरज नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.(Ram Mandir Bhumi Pujan: राम जन्मभूमी अयोध्येचा रस्ता शिवसेना पक्षानेच तयार केला; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा)

दरम्यान, भुमीपूजनाच्या तारखांबाबत आता नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असणार आहे. परंतु मोदी यांच्या उपस्थितीत भुमिपूजनाचा सोहळा पार पडावा अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. तर सोमपुराकडूनच मंदिराची उभारण्यात येणार आहे. कारण सोमनाथ मंदिर सुद्धा त्यांनीच साकारले आहे. मंदिर उभारणीसाठी पैशांची कोणतीच कमतरता नसणार आहे. मंदिरासाठी 10 करोड लोक दान देणार आहेत. राम मंदिर हे 161 फूट उंचीचे असणार असून यामध्ये तीन ऐवजी पाच घुमट तयार करण्यात येणार आहेत. तर नरेंद्र मोदी यांचे भुमिपूजनाबाबत उत्तर आल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होणार आहे. ट्रस्टच्या बैठकीला 15 पैकी 12 ट्रस्टी यांनी उपस्थिती लावली होती. राम मंदिराची उभारणी करणे हे करोडो लोकांची इच्छा असल्याचे ही सांगण्यात आले आहे.