अयोध्या रामजन्मभुमी राम मंदिराच्या भुमिपुजनाच्या आमंत्रणाची पक्ष चिंता करत नसल्याचे साउथ मुंबईचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रविवारी म्हटले आहे. त्यामुळे भुमिपुजनासाठी आम्हाला बोलावले किंवा न बोलावणे यासंदर्भात आम्हाला चिंता नसल्याचे ही सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अयोध्या राम मंदिराच्या ठिकाणी दोन वेळा भेट दिली होती. तसेच शिवसेनापक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मस्जिद तोडल्यानंतर त्यांचे यासदंर्भातील कठोर मत व्यक्त केले होते. राम मंदिरासंदर्भात आम्ही आमचे काम केले आहे. त्यामुळे आता आमचे नाते फक्त जिल्ह्यातील रामासोबत असल्याचे सावंत यांनी ANI शी बोलतना म्हटले आहे.
राम मंदिराच्या भुमिपूजनाचा सोहळा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे. श्री रामजन्मभुमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे गोविंद गिरी महाराज यांनी शनिवारी याबाबत स्पष्ट केले आहे. ट्रस्टने भुमिपूजनासाठी दोन सारखा ठरवल्या असून त्याच्या प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला आहे. या दोन्ही तारखा भुमिपूजनासाठी शुभ असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.(Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या भुमिपूजनाची तारीख अखेर ठरली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला प्रस्ताव)
भुमिपूजनाच्या तारखांबाबत आता मोदी यांचा निर्णय अंतिम असणार आहे. परंतु मोदी यांच्या उपस्थितीत भुमिपूजनाचा सोहळा पार पडावा अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. तर सोमपुराकडूनच मंदिराची उभारण्यात येणार आहे. कारण सोमनाथ मंदिर सुद्धा त्यांनीच साकारले आहे. मंदिर उभारणीसाठी पैशांची कोणतीच कमतरता नसणार आहे. मंदिरासाठी 10 करोड लोक दान देणार आहेत. राम मंदिर हे 161 फूट उंचीचे असणार असून यामध्ये तीन ऐवजी पाच घुमट तयार करण्यात येणार आहेत. तर नरेंद्र मोदी यांचे भुमिपूजनाबाबत उत्तर आल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होणार आहे. ट्रस्टच्या बैठकीला 15 पैकी 12 ट्रस्टी यांनी उपस्थिती लावली होती. राम मंदिराची उभारणी करणे हे करोडो लोकांची इच्छा असल्याचे ही सांगण्यात आले आहे.