Ram Mandir Trustee (Photo Credits-ANI)

देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिर उभारणी प्रकरणी आज ट्रस्टची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मंदिर उभारण्याच्या कार्यापूर्वी भुमीपूजनासाठी तारीख ठरवली आहे. त्यानुसार येत्या 3 किंवा 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर उभारण्याच्या कार्यापूर्वी भुमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु भुमिपूजनासाठी ठरवण्यात आलेल्या तारखेचा प्रस्ताव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर अंतिम निर्णय काय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबर राम मंदिराच्या नकाशात ही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टची स्थापना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत घोषणा)

ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल यांच्या अध्यक्षतेसाठी राम मंदिर प्रकरणीची बैठक जवळजवळ दीड तास पार पडली. तर भुमिपूजनाचा अंतिम निर्णय नरेंद्र मोदी घेतील असे ही ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी बैठकीनंतर मीडियाशी बातचीत करताना स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, देशाच्या सीमेवर अद्याप तणावासण काही प्रकरणे सुद्धा सुरु आहेत. भुमिपूजनाची तारीख ठरवण्यात आली असून ती पीएमओ यांना पाठवली आहे. तसेच सोमपुराकडूनच मंदिराची उभारण्यात येणार आहे. कारण सोमनाथ मंदिर सुद्धा त्यांनीच साकारले आहे. मंदिर उभारणीसाठी पैशांची कोणतीच कमतरता नसणार आहे. मंदिरासाठी 10 करोड लोक दान देणार आहेत.(राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय होता इतिहास? जाणून घ्या सविस्तर)

राम मंदिर हे 161 फूट उंचीचे असणार असून यामध्ये तीन ऐवजी पाच घुमट तयार करण्यात येणार आहेत. तर नरेंद्र मोदी यांचे भुमिपूजनाबाबत उत्तर आल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होणार आहे. ट्रस्टच्या बैठकीला 15 पैकी 12 ट्रस्टी यांनी उपस्थिती लावली होती. राम मंदिराची उभारणी करणे हे करोडो लोकांच इच्छा असल्याचे ही सांगण्यात आले आहे.