Ashadi Ekadashi 2022 Special Trains: आषाढी एकादशीनिमित्त रेल्वे चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळा आणि थांबे
Representational Image (Photo Credits: PTI)

यंदा 10 जुलै 2022 रोजी देवशयनी एकादशी (Ashadi Ekadashi 2022) येत आहे. एकादशी तिथी 9 जुलै रोजी दुपारी 4:39 वाजता सुरू होईल आणि 10 जुलै रोजी दुपारी 2:13 वाजता एकादशी तिथी समाप्त होईल. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी दि. 6 ते 14 जुलै दरम्यान एसटी महामंडळाच्या सुमारे 4700 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर आता माहिती मिळत आहे की, रेल्वे 9 जुलै 2022 आणि 10 जुलै 2022 रोजी जालना-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर आणि औरंगाबाद-पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवणार आहे.

तब्बल दोन वर्षानंतर आषाढी वारी होत आहे, मात्र राज्यामध्ये अजूनही कोरोनाचा संसर्ग आहे, अशात प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

आषाढी एकादशी विशेष ट्रेन्स-  

जालना-पंढरपूर-

गाडी क्रमांक 07468 आषाढी विशेष जालना येथून 9 जुलै रोजी सायंकाळी 7.20 वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी 6.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07469 आषाढी स्पेशल पंढरपूर येथून 10 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता सुटेल आणि जालना येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचेल.

थांबे: परतूर, सेलू, मानवत रोड, गंगाखेर, परळी वैद्यनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्सी टाऊन, कुर्डूवाडी

रचना: 2 स्लीपर क्लास, 4 द्वितीय श्रेणी राखीव, 6 सामान्य द्वितीय श्रेणी 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.

नांदेड-पंढरपूर-

गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड येथून 9.7.2022 रोजी दुपारी 3 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 07499 विशेष गाडी पंढरपूर येथून 10 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5.54 वाजता नांदेडला पोहोचेल.

थांबे: पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, गंगाखेर, परळी वैद्यनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, तंदूर, सेदाम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डुवाडी.

रचना: एक फर्स्ट एसी, दोन एसी-2 टियर, 6 एसी-3 टियर, 4 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास एक गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.

औरंगाबाद-पंढरपूर-

गाडी क्रमांक 07515 विशेष औरंगाबाद येथून 9 जुलै रोजी रात्री 9.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 07516 विशेष पंढरपूर येथून 10 जुलै रोजी रात्री 11 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता औरंगाबादला पोहोचेल. (हेही वाचा:  आषाढी एकादशी यंदा कधी साजरी होणार? जाणून घ्या व्रत महत्व आणि माहिती)

थांबे: जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, लातूर रोड, उस्मानाबाद, कुर्डूवाडी.

रचना: 2 स्लीपर क्लास, 5 द्वितीय श्रेणी राखीव, 10 सामान्य द्वितीय श्रेणी दोन गार्डच्या ब्रेक व्हॅन.

भुसावळ-पंढरपूर अनारक्षित-

गाडी क्रमांक 01123 विशेष गाडी भुसावळ येथून 9 जुलै रोजी दुपारी दीड वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्रमांक 01130 विशेष पंढरपूर येथून 10 जुलै रात्री साडे दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 1 वाजता वाजता भुसावळला पोहोचेल.

थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी.

रचना: 2 स्लीपर क्लास, 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन, 16 सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: 07469, 07499 आणि 07516 आषाढी विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर आधीच सुरू झाले आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

(वरील माहिती इन्टरनेट आधारीत आहे, तरी लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरून गाड्यांची माहिती घ्या.)