Ashadi Ekadashi 2022 Date: आषाढी एकादशी यंदा कधी साजरी होणार? जाणून घ्या व्रत महत्व आणि माहिती
Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

Ashadhi Ekadashi 2022 Date:  कोरोनामुळे मागील २ वर्षांपासून वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी  जाऊ शकले नाही. यंदा वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत.  लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शना साठी पाई जातात या निघणाऱ्या 'पंढरपूर वारी'ला (Pandharpur Wari) जुनी परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्रमध्ये 'आषाढी एकादशी'ला विशेष महत्त्व आहे. यंदा आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi)  रविवारी 10 जुलै 2022 रोजी आहे. विठूरायला भेटायची आस आणि मुखी विठ्ठू नामाचा जप करत, विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध झालेले वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे.

आषाढी एकादशीच्या व्रताचे महत्व (Ashadi Ekadsahi Vrat Importance)

आषाढी एकादशी व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत करणाऱ्याला धनाची प्राप्ती होते, अशी आस्था आहे, आषाढी एकादशीचे उपवास केल्याने मानसिक शांती लाभते आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते.  Ashadi Ekadashi Wari 2022: आषाढी एकादशी निमित्त 6 ते 14 जुलै दरम्यान एसटी महामंडळाच्या 4700 विशेष गाड्या

आषाढी एकादशीचे महत्व  

वर्षभरात येणाऱ्या एकादश्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशा महत्त्वाच्या मानल्या जातात. चातुर्मासात देव झोपलेले असल्यामुळे माणसाने स्वत:च्या संरक्षणासाठी या काळात व्रतं, उपवास, भजन-कीर्तन करण्याची पद्धत पाडली असावी. त्याचबरोबर या काळात पावसाळा असल्याने आरोग्याच्या दृष्टीने बेताने आहार घेणे केव्हाही उत्तमच. म्हणूनच पचायला जड असे पदार्थ टाळून उपवासाची परंपरा पडली असावी.

पंढरपूर वारीची परंपरा 

समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतं. यास 'पंढरीची वारी' असं म्हटलं जाते. यात सामिल होणारे सगळे 'वारकरी' असतात.

आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकाणांहून पालख्या घेऊन वारकरी विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात. सगळे भेदभाव विसरुन वारकरी वारीत सामिल होतात. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेऊन वारीची सांगता होते. आषाढी एकादशी महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो.