Doctor | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

वाशिमच्या राजाकिन्ही गावातील आरोग्य सुविधांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. देश या वर्षात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय पण स्वातंत्र्याच्या तब्बल ७५ वर्षानंतरही जर गावागावात अशी परिस्थिती असेल तर हे अगदीचं भीषण आहे. कोरोना महामारिनंतर देशभरातील आरोग्य सोय सुविधा उत्तम असाव्या याची जाणीव सर्वसामान्यांसह सरकारलाही झाली. केंद्र सरकारकडून देशातील प्रत्येक राज्यात यासंबंधित विशेष मोहिम राबवण्यात आली. त्यामुळे आवश्यकतेच्या वेळी रुग्णांना गरजेची ती सुविधा तबडतोब मिळण्यास मदत होईल. पण वाशिम जिल्ह्यातील राजाकिन्ही गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजाकिन्ही गावातील आरोग्य वर्धिनी केंद्रात हा प्रकार घडला असुन याबाबत रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

आरोग्य वर्धिन केंद्रात महिलांचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयेचा कॅम्प सुरु होता. दरम्यान अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळी उडाली. लाईट येवून जावून होती म्हणून डॉक्टरांनी चक्क मोबाईल टॉर्चचा वापर करत तब्बल १० महिलांवर शस्त्रक्रीया केल्या. तरी या शस्त्रक्रीया आटोपल्यानंतर रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांनी घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत माहिती दिली आहे. (हे ही वाचा:- Brain-Eating Amoeba: कोरोनानंतर मेंदू खाणारा अमिबामुळे जगभरात भीतीचे वातावर; संसर्गामुळे दक्षिण कोरियात एकाचा मृत्यू, काय आहे या आजाराची लक्षणं? जाणून घ्या)

 

या घटनेतून शासकीय रुग्णालयातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असुन परिसरातील वीजेची अडचण माहिती असतानाही रुग्णालयात जनरेटरची सुविधा उपलब्ध नसल्याचं उघडकीस आलं आहे. तरी वाशिम जिल्ह्यात हे चाल्लयं काय असा सवाल आता उपस्थित होत आहे. संबंधित तालुक्यातील आरोग्य विस्तार अधिकारी, शस्त्रक्रीया करणारे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.