लेखक अरविंद जगताप यांनी नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून युती आणि आघाडीला एक सणसणीत चपराक लगावला आहे. "स्वतःच्या हिंमतीवर राजा होण्याची ताकद नसेल तर स्वराज्याची स्वप्नं तरी दाखवू नका, महाराजांच्या नावे मतं मागू नका” अशा तीव्र शब्दात त्यांनी राजकारण्यांवर टीका केली आहे.
अरविंद जगताप हे त्यांच्या चला हवा येऊ द्या या रिऍलिटी शोमधील उत्तम पत्रलेखन शैलीमुळे अगदी घराघरात पोहोचले. ते उत्तम कवी देखील आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना आपल्या फेसबुक पोस्टद्वारे धारेवर धरले आहे.
‘स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, पण नेतानिवडीसाठी नाही’ असं म्हणत त्यांनी राजकारण्यांना सुनावलं आहे.
"गुजरातचे त्याकाळचे सत्ताधारी लोक एक मराठी राजा येईल म्हणून घाबरायचे. त्या मराठी राजांचं नाव होतं शिवाजी महाराज," असं म्हणत त्यांनी छत्रपतींच्या शौर्याची माहिती सांगितली आहे तर दुसऱ्याच ओळीत, "आता महाराष्ट्र कुणाची वाट पाहतो? कधी अहमद पटेल. कधी अमित शहा," असं थेट सवाल त्यांनी केला आहे.
पहा त्यांची पोस्ट,
भाजप-शिवसेना तुटेपर्यंत ताणणार की 'ठरलंय तसंच करणार'? काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सरकार स्थापनेवरून सध्या सुरु असलेल्या राजकारणामुळे अरविंद जगताप यांनी ही पोस्ट लिहिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या भूमिकेला सहमती दाखवत पाठिंबा दर्शवला आहे. 1 हजारहून जास्त शेअर्स तर 300 हुन प्रतिक्रिया या पोस्टवर दिसून येतात.