Money Laundering Case: अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबियांची बार आणि ऑर्केस्ट्रा मालकांकडून 4.7 कोटींची वसुली, ईडीने दिली माहिती
Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

मुंबईतील (Mumbai) विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 6 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ED) कोठडीत पाठवले आहे. न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पत्रात ईडीने 4.7 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याचे सांगितले आहे. यासोबतच ही रक्कम बार आणि ऑर्केस्ट्रा (Bars and orchestras) मालकांकडून वसूल केल्याचेही ईडीने म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्या कोठडी दरम्यान घरगुती जेवण आणि औषधे मिळण्यासाठीच्या अर्जाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याचवेळी त्याच्या वकिलालाही चौकशी दरम्यान एजन्सीने परवानगी दिली आहे. हेही वाचा Ashish Shelar On Nawab Malik: नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्या लोकांची नार्को टेस्ट करावी, भाजप आमदार आशिष शेलारांची मागणी

यापूर्वी सोमवारी ईडीने अनिल देशमुख यांची 12 तास चौकशी केली होती. त्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोपही केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत राहिले, परंतु तरीही त्यांच्या तपासाच्या आधारे ईडीने त्यांना अटक केली आहे.

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची ही सुनावणी दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू होऊन 4.15 वाजेपर्यंत चालली. आज तत्पूर्वी, ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयात पोहोचले. ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार देशमुख यांच्यासह न्यायालयात दाखल झाले. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी देशमुख यांच्या 14 दिवसांच्या कोठडीसाठी कोर्टात अर्ज केला होता मात्र न्यायाधीश पीबी जाधव यांनी अनिल देशमुख यांना 4 दिवसांची कोठडी सुनावली.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याने आणि या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाजे यांची भूमिका आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याचबरोबर या प्रकरणात अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक संजय पालांडे आणि कुंदन शिंदे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.