देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाल्या त्या
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis (Photo Credits: Instagram)

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्या सोबत त्यांनी शनिवारी सकाळी सरकार स्थापन केले. परंतु बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतेच एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून महाराष्ट्र विकास आघाडीला टोला लगावला आहे. त्यांनी सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर एक शायरी लिहीत आम्ही पुन्हा येऊ असा संदेश दिला आहे. सध्या असलेला मौसम लवकरच बदलेल आणि भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास अमृता यांनी व्यक्त केला आहे.

पाहा त्यांचं ट्विट,

तसेच पाच वर्ष जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मनात या सर्व आठवणी त्यांच्यासाठी कायमच खास राहतील असं देखील अमृता यांनी म्हटलं आहे. इतक्यावरच न थांबता त्या म्हणाल्या की त्यांच्याकडून जितकं होऊ शकलं तितकं त्यांनी काम जनतेसाठी केलं आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्नही केला.

Maharashtra Government Formation Live News Updates: उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे आभार मानले

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात जयंत पाटील यांनी जाहीर केल्यानुसार उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत व त्यांचा शपथविधी 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांचं मिसेस मुख्यमंत्री हा किताब उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे जाणार आहे.