Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
51 minutes ago

Amravati Shocking: अमरावतीत पावसाने केला कहर! 14 वर्षांचा मुलगा गेला वाहून

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भातील अमरावतीमध्येही पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत अमरावती येथून दोन वेगवेगळे अपघात समोर आले आहेत. ज्यात एक 14 वर्षांचा मुलगा नाल्यात वाहून गेला तर दोन महिलांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

महाराष्ट्र Shreya Varke | Jul 15, 2024 04:47 PM IST
A+
A-

Amravati Shocking: संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भातील अमरावतीमध्येही पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत अमरावती येथून दोन वेगवेगळे अपघात समोर आले आहेत. ज्यात एक 14 वर्षांचा मुलगा नाल्यात वाहून गेला तर दोन महिलांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे लाल खारी भागातील अंबा नाला तुडुंब भरला. त्यामुळे १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला. दुसरी घटना धामणगाव तालुक्यातून उघडकीस आली आहे. ज्यामध्ये दोन महिलांवर वीज कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबा नाला अमरावतीमधील सर्वात मोठा नाला आहे. हा नाला शहरात अनेक ठिकाणाहून वाहतो. याच नाल्यात लाल खारी कब्रस्तानजवळील 14 वर्षीय परवेज अफरोज खान हा मित्रांसोबत खेळत असताना अचानक पाणी वाढल्याने मुलगा पाण्यात वाहून गेला. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच सर्वजण नाल्याजवळ जमा झाले. नागपुरी गेट पोलीसही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत मुलगा सापडला नव्हता.


Show Full Article Share Now