जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) शहरात आढळून आले आहेत. दरम्यान, राज्य सरकार कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी लपवत आहे, असा आरोप विरोधीपक्षातील अनेक नेते करत आहेत. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोव्हिड-19 संदर्भातील आकडेवारी, माहिती नेहमीच पारदर्शकपणे जाहीर केली आहे, असे अमेरिकेतील वृत्तपेपर 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने (The Washington Post) आपल्या लेखात लिहले आहे. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. भारतातील सर्व बड्या शहरांपैकी फक्त मुंबईच कोरोनाबाधित रुग्णांच्याबाबतीत खरी व पारदर्शक आकडेवारी देत आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

टमहाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. दरम्यान, मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून मुंबई महानगरपालिकेचे कौतुक करण्यात आले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात COVID19 च्या रुग्णांचा मृत्यूदर 3.91 वर पोहचला

जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट-

 

दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कामगार आपल्या जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. यामुळे संपूर्ण देशातून त्यांचे कौतूक केले जात आहेत. मुंबईत आज आणखी 1 हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 65 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 178 वर पोहचली आहे. यापैंकी 5 हजार 647 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.