महाराष्ट्रात COVID19 च्या रुग्णांचा मृत्यूदर 3.91 वर पोहचला
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोविड19 च्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा 24 तासात 8 हजारांच्या पार गेल्याचे समोर आले आहे. तर काल महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्याने 8308 रुग्णांची भर पडल्याने आकडा 2,92,589 वर पोहचला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या जवळ पोहचण्याची अधिक शक्यता आहे.मेडिकल ऐज्युकेशन अॅन्ड ड्रग्स डिपार्टमेंट, महाराष्ट्र यांच्या मते, आणखी 258 कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण कोरोना व्हायरसच्या मृतांचा आकडा 11,452 वर पोहचला आहे. तर सध्या कोविड19 च्या रुग्णांचा मृत्यूदर 3.91 टक्क्यांवर पोहचल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईत सुद्धा गेल्या 24 तासात शहरात 1214 रुग्णांची भर पडली असून 69,340 जणांचा प्रकृती सुधारली आहे. तर शहरात सध्या 23,948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात आणि महापालिकेच्या क्षेत्रात अनुक्रमे 266आणि 1539 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या 1,20,480 अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. आकडेवारीनुसार, 20.37 टक्के लोक हे 31-40 वयोगटातील आहेत. तर 96 टक्के लोकांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाची कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत.(महाराष्ट्रात आतापर्यंत 642 कैदी व तुरुंगातील 206 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, पहा आकडेवारी)

दरम्यान, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तर कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर काही दिवसांपूर्वी महापालिकेने पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून केंद्राकडून राज्याला 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती दिली होती. हे सर्व व्हेंटिलेटर्स एकत्रितपणे नव्हे तर टप्प्याटप्प्याने देण्यात आलेले आहेत. केंद्राकडून देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर्स विविध कोविडच्या रुग्णालयात पुरवले जात असल्याचे ही महापालिकेने स्पष्ट केले आहे