
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Eknath Shinde) आज (6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा कार्यक्रमही ठरला आहे. मात्र, सर्वांचे लक्ष आहे ते राजकीय घडामोडींवर. येणारे वृत्तही तसेच आहे. शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात एक बैठक पार पडली. ही बैठक रात्री उशीर पर्यंत चालली. दरम्यान, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही तातडीने पुण्याला बोलवून घेतल्याचे समजते. याच वेळी शाह यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेगवेगळी स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीतील तपशीलाबाबत उत्सुकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा नुकताच झाला. त्यानंतर पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरासुद्धा पुण्यातच होतो आहे. त्यामुळे भाजपने पुण्यामध्ये आणि खास करुन पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोर लावला आहे. ‘सहकारातून समृद्धी’ संकल्पनेअंतर्गत केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाने संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी सायंकाळी शाह यांचे पुणे येथे आगमन झाले. (हेही वाचा, Amit Shah Visit in Pune: केद्रींय मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर, पिंपरी-चिंचवड येथे कडक बंदोबस्त)
अमित शाह हे पुणे येथील एका हॉटेलमध्ये उतरले आहेत. या हॉटेलमध्येच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती आखण्यावर या नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते. अजित पवार सोबत आल्याने महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात 48 जागांपैकी सर्वच्या सर्व जागा आपण जिंकू शकतो, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.