'मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवू नये', असे ट्विट करत अमेय खोपकर यांनी प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर साधला निशाणा
Amey Khopkar, Ram Kadam and Pravin Darekar (Photo Credits: facebook and IANS)

काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि राम कदम (Ram Kadam) यांनी मनसे शिवसेनेच्या वाटेवर येत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर आज मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी ट्विट करत या दोघांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा करू नये" असे ट्विट करत त्यांनी दरेकर आणि राम कदम यांना खडे बोल सुनावले आहे. तसेच मनसेला रामराम ठोकून बेडूकउड्या मारून दुस-या पक्षाची लाचारी करणा-यांना आपण अजिबात भीक घालत नाही असेही ते म्हणाले.

ट्विटरच्या माध्यमातून प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांनी मनसेविरोधात केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे.

पाहा अमेय खोपकर यांचे ट्विट:

“पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राज ठाकरे आणि आम्हांला काडीचीही गरज नाही”, असं अमेय खोपकर यांनी ट्वीट करत प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावल निशाणा साधला.

हेदेखील वाचा- मुंबई पोलिसांच्या आदेशावरुन मनसे ने वळविला 9 फेब्रुवारीचा मोर्चा; 'हा' असेल नवा मार्ग

“विचारधारा वगैरे शब्द प्रवीण दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे”, अशी टीकाही खोपकर यांनी केली.

“राम कदम यांना जुने दिवस आता आठवत नसतील कदाचित, पण जेव्हा ते मनसेमध्ये होते तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका. कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत”, असं खोपकर म्हणाले.