औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीत शिवसेना -भाजपा युतीचे अंबादास दानवे यांचा दणदणीत विजय
Shivsena | (Photo courtesy: archived, edited images)

महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद –जालना स्थानिक स्वराज्यसंस्थेमधून झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अंबादास दानवे (Ambadas Eknathrao Danve) यांचा विजय झाला आहे. दानवे यांनी कॉंग्रेस उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांचा पराभव केला आहे. महायुतीचे अंबादास दानवे यांना 524 मतं, तर कॉंग्रेस आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांना 106 मतं मिळाली आहेत. या निवडणूकीदरम्यान औरंगाबादमध्ये शिवसेना एमआयएममध्ये राजकीय संघर्ष पेटला असताना पक्षाच्या नगरसेवकांनी दानवे यांना मदत केल्याची चर्चा देखील रंगली आहे.

आगामी काही दिवसातच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सारेच पक्ष तयारीला लागले आहेत.मात्र यापूर्वी झालेल्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडून मोठी अपेक्षा वाढली होती.. प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीमध्ये युतीकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. कॉंग्रेस आघाडीन बाबुराव कुलकर्णी यांना तिकीट दिले होते.

औरंगाबादमध्ये या निवडणूकीपूर्वी मतदानाच्या आधी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचं देखील पहायला मिळालं आहे.