केरळ मधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड-19 RT-PCR टेस्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Covid 19 Test | Representational Image | (Photo Credits: PTI)

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने एकीकडे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच केरळ (Kerala) मधून येणाऱ्या प्रवाशांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मोठा निर्णय घेतला आहे. केरळवरुन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड-19 (Covid-19) ची RT-PCR टेस्ट निगेटीव्ही असणे अनिवार्य आहे. यापूर्वी चार राज्यांसाठी हा नियम लागू होता. यामध्ये गुजरात (Gujarat), गोवा (Goa), दिल्ली (Delhi) आणि राजस्थान (Rajasthan) या राज्यांचा समावेश होता. आता या यादीत केरळचा देखील अंतर्भाव झाला आहे.

केरळ विमानतळावर प्रवाशांना विमान उड्डाणापूर्वी त्यांचे कोविड रिपोर्ट्स तपासणे अनिवार्य केले आहे. यासोबतच ट्रेन प्रवाशांसाठी देखील हा नियम लागू करण्यात आला आहे. ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आरटी-पीसीआर टेस्टचा निगेटीव्ह रिपोर्ट बाळगणे गरजेचे आहे. हा रिपोर्ट ट्रेनच्या वेळेच्या 96 तासापूर्वीचाच असावा, असे सरकारचे म्हणणे आहे.

ANI Tweet:

कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र पूर्वीपासूनच अग्रेसर होतं. तसंच गेल्या आठवड्यातील रिपोर्टनुसार, वरील राज्यांमध्ये देशातील 90 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची नियंत्रणात आलेली संख्या पुन्हा वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Coronavirus in Maharashtra: दशलक्ष लोकसंख्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोनाबाबत राज्याची परिस्थिती अतिशय उत्तम; रुग्णसंख्या, मृत्यू दर आणि सक्रिय रुग्ण झाले कमी)

दरम्यान, सध्या राज्यात 35,633 सक्रीय रुग्ण असून 19,63,946 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 95.7% इतका झाला आहे.