हरिहरेश्वर समुद्रकिनारी एक संशयित बोट सापडल्यानंतर रायगड जिल्हा आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिस तपास सुरू आहे. संशयास्पद बोटीमध्ये AK 47 बंदुका आढळून आल्या आहेत. एकूण तीन बंदुकांनी भरलेलील बॅक समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने, आता यामागे काही घातपाताचा कट होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. तटरक्षक दल आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस विभाग आवश्यक कार्यवाही करत आहे. तसेच, महाराष्ट्र एटीएसचे पथक रायगडकडे रवाना झाले आहे. प्राथमिक तपासात ही बोट ओमान सुरक्षा दलाची असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
Tweet
Maharashtra | Security tightened in Raigad district and nearby areas after a suspected boat was found near Harihareshwar Beach. Police investigation underway. pic.twitter.com/UObgOxkB30
— ANI (@ANI) August 18, 2022
Maharashtra ATS team has moved for Raigad, where a suspicious boat with weapons was found at Harihareshwar Beach https://t.co/qIRnaFd4aA
— ANI (@ANI) August 18, 2022
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (14 ऑगस्ट, गुरुवार) दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि आघाडी सरकारमधील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. याची सखोल चौकशी करण्याची मागणी आदिती तटकरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर विधानभवनात पोहोचले. याबाबतची माहिती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेअर केली. महाराष्ट्रासह देशभरात सध्या सणांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या जन्माष्टमी आहे. यासोबतच गणेशोत्सवही येत आहे. अशा वेळी संशयास्पद बोटीतून शस्त्रसाठा जप्त झाल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बळ देण्याची मागणीही आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
प्राथमिक माहितीनुसार, ओमान सुरक्षेची स्पीड बोट
ही बोट ओमान सुरक्षा दलाची असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. ही काही संशयास्पद बोट नाही. हे वृत्त आता प्रशासनाच्या सूत्रांकडून येत आहे. त्यात विघटन करणारी शस्त्रे आहेत. ही बोट भटकून इथपर्यंत पोहोचली आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये ओमानमध्ये बचाव कार्य करण्यात आले. त्याचवेळी रायगडावर नुकतीच पोहोचलेली ही बोट भरकटली असावी. अशी शंका उपस्थित केली जात आहे. (हे देखील वाचा: वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत एसटी प्रवास; सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ; CM Eknath Shinde यांची मोठी घोषणा)
संरक्षणासाठी शस्त्रे पुरवणारी ब्रिटिश कंपनीची बोट
ही बोट नेपच्यून मेरीटाइम सिक्युरिटी लिमिटेड नावाच्या ब्रिटीश कंपनीची बोट आहे. या कंपनीची यूकेमध्ये 2009 मध्ये नोंदणी झाली आहे. ही कंपनी सुरक्षेसाठी शस्त्रे पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी हल्ल्याला तोंड देण्यासाठी शस्त्रे पुरवते.