राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याचा निर्णय आपण मागे घेत असल्याची माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. पवार यांच्या आगोदरच्या निर्णयासोबतच या नव्या निर्णयाचीही जोरदार चर्चा झाली. दरम्यान, पत्रकार परिषदेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अजित पवार (Ajit Pawar) यांनी. अजित पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. त्यामुळे इतकी महत्त्वाची पत्रकार परिषद असूनही अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांसाठी आश्चर्याचा विषय ठरला. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया, मते येऊ लागली. प्रकरण वाढताच मग स्वत: अजित पवार यांनीच यावर स्वत: भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील अनुपस्थिती आणि अजित पवार यांची दांडी यावर स्वत: अजित दादा काय म्हणाले घ्या जाणून.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांनी आपला निर्णय जाहीर करताच अजित पवार यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे. (हेही वाचा, Sharad Pawar यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर NCP च्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण, पहा व्हिडिओ)
ट्विट
साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला.तेच अध्यक्षपदी कायम राहतील,हा निर्णय एकमतानं झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 5, 2023
साहेबांनी (शरद पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला. तेच अध्यक्षपदी कायम राहतील,हा निर्णय एकमतानं झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल. दरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.