Maharashtra Economic Survey 2021: अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा 2020-21 चा आर्थिक पाहणी अहवाल; अर्थव्यवस्थेत - 8% वाढ अपेक्षित
Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या 5 व्या दिवशी राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Maharashtra Economic Survey 2021) सादर झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचा 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडताना राज्याची अर्थव्यवस्था - 8 टक्के तर देशाची अर्थव्यवस्था -8 टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्याला कोरोना संकटाचा फटका बसल्याचं नमूद करताना त्यांनी अर्थव्यवस्थेला 1 लाख 56 हजार 925 कोटींची घट अपेक्षित असल्याचं सांगितले आहे. तर राज्याचा जीडीपी  (GDP) यंदा 5.7% राहणार असल्याचं देखील म्हटलं आहे. Economic Survey 2020-21: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल, 2021-22 मध्ये GDP वाढीचा दर 11% ची अपेक्षा व्यक्त.

दरम्यान आजच्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात त्यांनी चांगल्या पावसामुळे वर्षभरात कृषी विकास दरात 11.7% वाढ‌ अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. राज्यातीलउद्योग जगतात - 11.3 टक्के आणि सेवा क्षेत्रात - 9 टक्के वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज देखील अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कर महसूल आणि करेतर महसूल हा अनुक्रमे 2,73,181 कोटी आणि 74,276 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाज 2020-21 नुसार, राज्याचा महसुली खर्च 3 ,56,968 कोटी आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असून वने आणि लाकूड तोडणी 5.7 % वाढ अपेक्षित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राज्यात मत्स व्यवसाय आणि मत्स शेती मध्ये 2.6 टक्के वाढ अपेक्षित आहे. वस्तू निर्माण -11.8 टक्के, बांधकाम -14.6 टक्के असल्याने उद्योग क्षेतात -11.3 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. इथे वाचा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२०-२१  सविस्तर.

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2020-21 यंदा 8 मार्च दिवशी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेती, वीज ते इंधन दर या महत्वाच्या विषयांवर कोणत्या घोषणा होणार? राज्यात कोविड 19 लसीकरणासाठी कोणती विशेष योजना लागू होणार का? याकडे देखील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.