मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नेव्ही कडून उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Collapse of Shivaji Maharaj Statue) पडल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच सरकार वरही विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशात आज शासनाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही घटना क्लेशदायक असल्याचं म्हटलं आहे. तसेच याबाबत आपण सरकारचा भाग म्हणून 13 कोटी जनतेची माफी मागतो असंही म्हटलं आहे. 8 महिन्यातच शिवरायांचा पुतळा कोसळल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह उभारले जात आहेत. 'महाराजांचा पुतळा उभारताना तेथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान यासारख्या महत्वाच्या बाबींचा वैज्ञानिक अभ्यास केला होता का ? पुतळा बनवण्याच्या सामग्रीची गुणवत्ता याचा शोध घेत संबंधित जबाबदार लोकांची राज्य सरकारने तातडीने चौकशी करत गुन्हे देखील दाखल केले आहेत. लवकरात लवकर राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली जाईल पण अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या प्रत्येक संबंधितावर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल.' असंही अजित पवार यांनी X वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज प्रतिक्रिया देताना शिवरायांचा पुतळा कोसळणं ही घटना वाईट आहे आणि त्याचं राजकारण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Uddhav Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: 1 सप्टेंबर रोजी महाविकासआघाडीचा मुंबईत मोर्चा; उद्धव ठाकरे यांची घोषणा .
अजित पवारांनी मागितली माफी
गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. महाराजांचा तो पुतळा कोसळल्याची घटना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींप्रमाणे माझ्यासाठी देखील अतिशय क्लेशदायक आहे. मी शासनाचा भाग… pic.twitter.com/4hfI2yFPpe
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 28, 2024
26 ऑगस्ट दिवशी मालवण च्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 4 डिसेंबर 2023 रोजी अनावरण करण्यात आलेला 35 फुटी पुतळा कोसळला आहे. या प्रकरणी शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कंस्टल्टंट केलेल्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 24 वर्षीय शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे तर स्ट्रक्चरल कंस्टल्टंट चेतन पाटील यांनी आपण यामध्ये सहभागी नसल्याचं म्हटलं आहे.